आंबोली धबधबा परिसरात जुगार खेळताना दोघे अटक

2

एलसीबीची कारवाई: वीस हजारांचा मुद्देमाल जप्त

आंबोली, ता.२७: येथील मुख्य धबधबा परिसरात असलेल्या स्टॉलमध्ये जुगार खेळताना दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल २० हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
अमर सुखदेव माने (३७, रा.कोल्हापूर) व अँथोनी फ्रान्सिस डिसोजा (३७, रा.मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की येथील परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती.दरम्यान याची दखल घेऊन तात्काळ धाड टाकत ही कारवाई करण्यात आली.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14

4