कणकवली, ता. २७ : शहरातील बेपत्ता सुनील सुधीर पवार (वय 32, रा.बांधकरवाडी) याचा मृतदेह आज आढळला. तो 23 जुलैपासून बेपत्ता होता. सायंकाळी 4 च्या सुमारास शहरालगतच्या हरकुळ बुद्रूक येथील स्थानिकांना मुडेश्वर मंदिर परिसरातील जंगलमय भागात मृतदेह आढळून आला.
सुनील पवार याचा डंपर व्यवसाय होता. 23 जुलै रोजी तो सकाळी दहाच्या सुमारास घरातून कुणासही न सांगता बाहेर पडला. त्यानंतर तो परतला नव्हता. तसेच नातेवाईक आणि कुटुंबीयांकडे शोधाशोध करूनही त्याचा ठावठिकाणा आढळला नव्हता. त्यामुळे सुनील यांची पत्नी गौरी हिने बेपत्ता असल्याची फिर्याद कणकवली पोलिसांत 23 जुलै रोजी दिली होती. गेले दोन दिवस मुडेश्वर मंदिर परिसरात कुजल्याचा वास येत होता. आज हरकुळ बुद्रूक येथील स्थानिकांनी त्याबाबतची खातरजमा करण्यासाठी शोध घेतला असता कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. पवार याच्या नातेवाइकांनी हा मृतदेह सुनील याचाच असल्याचे सांगितले. दरम्यान सुनील याचा घातपात की आत्महत्या याबाबतचे प्राथमिक माहिती शवविच्छेदनानंतर उपलब्ध होईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
बेपत्ता सुनील पवारचा मृतदेह जंगलात आढळला
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES