कोकणच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाची स्थापना

173
2
Google search engine
Google search engine
Google search engine

उपाध्यक्षपदी प्रमोद जठार यांची नियुक्ती : कोकणातील पर्यटन प्रकल्प मार्गी लागणार

कणकवली, ता. २७ : कोकणातील सात जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. या संचालनालयाच्या कामकाजासाठी पर्यटन विकास समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी पर्यटन मंत्री असणार आहेत. तर उपाध्यक्षपदी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणात होणार्‍या सर्व पर्यटन प्रकल्पांचे कामकाज ही समिती पाहणार आहे. या समितीच्या स्थापनेमुळे कोकणातील सीवर्ल्ड व इतर पर्यटन विषयक प्रकल्प मार्गी लागणार असल्याची ग्वाही पर्यटन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.
कोकण पर्यटन विकास समितीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणात येणारे प्रकल्प, त्याबाबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता, चालू प्रकल्पांचे नियंत्रण, पर्यटन विषयक नवीन योजना आणि प्रकल्प सुचविणे, केंद्र शासनाच्या योजनेत येणारे प्रकल्प सुचविणे, चांदा ते बांदा योजनेंतर्गत पर्यटन प्रकल्पांशी संबंधित कामे मार्गी लावणे आदी कामकाज होणार आहे. ही समिती पाच वर्षासाठी कार्यरत राहणार आहे.

\