राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; दोन आरोपी अटक
कणकवली, ता.२७ : कणकवली एस. टी. स्टॅण्ड आणि रेल्वे स्थानक परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीने धडक कारवाई करत गोवा बनावटीची ३० हजार ८३० रूपयाची दारू जप्त केली. तर हि दारू बाळगणाºया दोन आरोपींनाही अटक केली.
कणकवली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक राजन साळगावकर व त्यांच्या सहकाºयांनी कणकवली बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात दोन ठीकाणी दारू वाहतुक करणाºया आणि बाळगणाºयांवर छापा टाकुन दारू जप्त केली. यात गोवा बनावटीच्या दारूचा समावेश आहे. हि दारू एसटीच्या माध्यमातून नेत असताना कणकवली एसटी स्टॅण्ड येथे दोघांना अटक केली. उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असल्याने अटक करणाºया आरोपींची नावे समजू शकलेली नाहीत.