अर्चना घारे फाऊंडेशनतर्फे आयोजन : माटणे सातेरी
पूर्वचारि मंडळ व्दितीय
दोडामार्ग,ता. २७ : रत्नांची खाण असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सौ. अर्चना घारे-परब फाऊंडेशनचा भजन स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांनी आज येथे केले.
श्री. दळवी आज अर्चना फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित भव्य भजन स्पर्धेप्रसंगी बोलत होते. त्यांनी या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. ही स्पर्धा खासदार सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस, श्री सद्गुरू संगीत कला व स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्ग यांच्या सहकार्याने आयोजित केली होती.
स्पर्धेत मणेरी येथील स्वराभिषेक भजन मंडळ प्रथम तर व्दितीय क्रमांक माटणे सातेरी
पूर्वचारि भजन मंडळ, खोक्रल शांतादुर्गा सिद्धेश्वर भजन मंडळाने तृतीय तसेच सातेरी दिंडी पथक विर्डी व सातेरी भजन मंडळ माटणे यांनी अनुक्रमे चौथा व पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. मणेरी भजन मंडळाला उत्कृष्ट कोरस व गायक, सातेरी पुरावचारी भजन मंडळ माटणेला उत्कृष्ट तबला, शांतादुर्गा सिद्धेश्वर भजन मंडळाला होर्मोनियम अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.
यावेळी सौ. घारे म्हणाल्या, तळागाळातून मिळणारा पाठिंबा हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. यामुळे ज्या पक्षाने मला मानसन्मान दिला त्यातून माझ्या भागात सर्वसामान्य लोकांसाठी काम करताना मला आनंद होत आहे.
यावेळी व्यासपीठावर संदीप गवस, प्रेमानंद देसाई, प्रदीप चांदेलकर, सुदेश तुळसकर, बाबी बोर्डेकर, गोविंद महाले व प्रेमप्रकाश नाईक आदी उपस्थित होते.
स्पर्धेत एकूण 9 संघांनी भाग घेतला होता. एकापेक्षा एक भजने ऐकून रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभप्रसंगी अर्चना घारे फाऊंडेशनचे संदीप घारे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव बोर्डेकर, राष्ट्रवादी सचिव व मानवी हक्की आयोगाचे सिंधुदुर्ग रिपोटींग ऑफिसर संदीप गवस, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्गचे संचालक प्रेमप्रकाश नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गवस, राष्ट्रवादी पदाधिकारी व माजी सरपंच प्रदीप चांदेलकर तसेच स्पर्धा परीक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्री. गवस यांनी मानले.