Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानितेश राणेंनी साधला वैभववाडी शहरवासीयांशी संवाद...

नितेश राणेंनी साधला वैभववाडी शहरवासीयांशी संवाद…

जाणून घेतल्या विविध समस्या; नागरिकांमधून समाधान व्यक्त…

वैभववाडी, ता. २८ : शहरवासीयांच्या समस्या,अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी न.पं.वार्डमधील प्रत्येक घराघरात भेट दिली.त्यांच्या अचानक भेटीने नागरिकांनी समाधान व्यक्त करत निर्भीडपणे आमदार नितेश राणे यांच्याशी संवाद साधत,समस्या मांडल्या.
न. पं. अस्तित्वात आल्यापासून वैभवाडी शहराच्या विकासासाठी सुरुवातीपासून आमदार नितेश राणे प्रयत्नशील राहिले आहेत.पर्यटन जिल्ह्याचे वैभववाडी म्हणजे प्रवेशद्वार. त्यामुळे वैभववाडी शहराचे वैभव अधिक खुलविण्यासाठी त्यांनी विविध विकासात्मक उपक्रम शहरात राबविले.शासनाच्या निधीची वाट न बघता स्वखर्चातून सुलभ शौचालय व स्वच्छता गृह हा विषय श्री.राणे यांनी मार्गी लावला.
शनिवारी सायंकाळी नितेश राणे यांनी अचानक नगरपंचायत मधील वार्ड मध्ये घरभेट दौरा केला.वार्ड क्रमांक १, ३, ४, ५, ६,११ व इतर वार्डामध्ये त्यांनी प्रत्येक घरात जाऊन थेट नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या.वार्ड क्रमांक तीन मधील धोकादायक वीज खांब बदलण्यात यावा अशी मागणी संबंधित नागरिकांनी केली.तर वार्ड क्रमांक १ मधील डांगे चाळी कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी पप्पू डांगे यांनी केली.वार्ड क्रमांक ४ मध्ये श्री.कडू यांच्या घरावरून जाणारी मुख्य वीज वाहिनी बदलण्यात यावी.आदी समस्या नागरिकांनी श्री.राणे यांच्यासमोर मांडल्या.आपण जनतेचे सेवक आहोत.त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविणे ही आपली जबाबदारी आहे.जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी करू नये.अशा सूचना श्री.राणे यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक यांना नागरिकांसमोर दिल्या.

आ. राणे यांची बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट

घरभेट कार्यक्रम प्रसंगी आ. नितेश राणे यांनी जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांच्या घरीही भेट दिली.त्यांच्याकडून ही समस्या जाणून घेत विचारपूस केली.आपले काम अभिमानास्पद आहे.त्याबद्दल आमच्या मनात तीळमात्रही शंका नाही.माझे कुटुंब कायम आपल्या पाठीशी असेल असेही श्री चव्हाण यांनी सांगितले.काही नगरसेवक खरोखर प्रामाणिक आहेत.परंतु काहीजण कामचुकार आहेत.त्यामुळे शहराच्या विकासासाठी काही वेळा आवाज उठवावा लागतो.व तुमच्या निदर्शनाला आणून द्यावे लागते.यापुढे ते काम मी करत राहणार असे त्यांनी सांगितले.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे या शहरावर फार उपकार आहेत त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही.असे सांगायलाही गुलाबराव चव्हाण विसरले नाहीत.
या घरभेट प्रसंगी वैभववाडी स्वाभिमान अध्यक्ष अरविंद रावराणे, नासीर काझी, नगराध्यक्ष दीपा गजोबार, जयेंद्र रावराणे, दिगंबर पाटील, रोहन रावराणे, प्राची तावडे, हुसेन लांजेकर, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, रवींद्र रावराणे, समिती सभापती सर्व नगरसेवक व स्वाभिमान पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments