सावंतवाडीत अंडा पॅटीसमध्ये आढळले प्लास्टिक

1511
2

सावंतवाडी, ता. २८: शहरातील एका बेकरीत एका शाळकरी मुलीने घेतलेल्या अंडा पॅटीसमध्ये चक्क प्लास्टिक आढळल्याचा प्रकार आज येथे घडला. ही घटना येथील पालिकेला लागुन असलेल्या एका बेकरीत घडली.
तो प्लास्टिकचा भाग म्हणजे प्लास्टिकचे अंडे असल्याचा आरोप त्या मुलीचे वडील दीपक कुबल यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या वडिलांनी अन्नभेसळ तसेच पोलीसांकडे धाव घेण्याचा इशारा दिला आहे. तर आपण अडचणीत येऊ नये म्हणून त्या परप्रांतीय बेकरी चालकांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की सांगेली येथील दीपक कुबल यांची मुलगी गार्गी ही सकाळी क्लास निमित्त सावंतवाडी आली होती. यावेळी भूक लागल्यामुळे तीने नगरपालिका परिसरात असलेल्या एका बेकरी मधून अंडा पॅटीस घेतले. दरम्यान तिथे पॅटीस खात असताना अचानक तिला गळ्याकडे काहीतरी अडकल्यासारखे वाटले. तिने बाहेर काढून पाहिले असता तो प्लॅस्टिकचा तुकडा असल्याचे दिसले याबाबतचा प्रकार तिने आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जावून बेकरी चालकाला जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कुबल नाराज झाले आहेत. त्यांनी हा प्रकार म्हणजे माझ्या मुलीसाठी किंवा अन्य लोकांसाठी घातक ठरणार आहे असा आरोप करून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्नभेसळ विभाग आणि सावंतवाडीकडे पोलिसांकडे तक्रार करणार आहे असे त्यांनी सांगितले.

4