Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याऑगस्टमध्ये 5 हजार 90 घरांची लॉटरी

ऑगस्टमध्ये 5 हजार 90 घरांची लॉटरी

 सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी प्रयत्नशील:उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी ता,२८:– गिरणी कामगारांसाठी पूढील महिन्यात ऑगस्ट मध्ये 5 हजार 90 घरांची म्हाडामार्फत लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात येणार आहे. गिरीणी कामगारांच्या यादीत 1 लक्ष 74 हजार 218 गिरणी कामगारांच्या नावांची नोंदणी झाली आहे. या सर्व कामगारांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मार्फत निश्चित घरे उपलब्ध करून देण्यात येतील यासाठी म्हाडामार्फत नियोजन सुरू आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित गिरणी कामगारांच्या मेळाव्यात केले.
या प्रसंगी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, नागेंद्र परब, अतुल बंगे, संजय पडते, मंगेश लोके, म्हाडाचे कार्यकारी अभियंता सुभाष माळी, गिरणी कामगार उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कासणे, वरिष्ठ पडताळणी अधिकारी रविंद्र कोकडे व संजय पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑगस्ट मधील लॉटरीमध्ये बॉम्बेडायिंग मिल, बॉम्बेडायिंग स्प्रींग मिल व एमएमआरडीए यांच्याकडून प्राप्त यादीतील गिरणी कामगारांचा समावेश असल्याचे सांगून श्री. सामंत म्हणाले की म्हाडा मार्फत यादीतील नोंदणी झालेल्या सर्व कामगारांना घरे मिळावीत यासाठी सुयोग्य नियोजन सुरू असून याबाबत मुंबईत कांजूरमार्ग मिठागरे तसेच उपनगरातील शासनाच्या मालकीच्या जागांचा शोध सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिरणी कामगारांचे संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या शंकाचे निरसण व्हावे यासाठी म्हाडाचा अधिकारी प्रत्येक महिन्यात एक दिवस जिल्ह्यात येईल. ते पुढे म्हणाले सिंधुदुर्गात म्हाडामार्फत 1 हजार घरे बांधता येतील यासाठी जिल्ह्यात जागा उपलब्धतेबाबत सहकार्य अपेक्षित आहे. आजच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याबाबत आमदार वैभव नाईक यांनी भरपूर योगदान दिले आहे. गिरणी कामगारांनी घरांच्या लॉटरीपध्दतीमध्ये कोणत्याही दलालाचा आधार घेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी पॉवर-पाईंटच्या प्रेन्झेटेशनच्या माध्यमातून म्हाडाची लॉटरी पध्दत, नावाची नोंदणी पाहणे आदीबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. गिरणी कामगारांनी पुढील संकेतस्थळावर माहिती पहावी असे आवाहन त्यांनी केले. https://millworker.mhada.gov.in असे म्हाडाचे संकेतस्थळ आहे. त्या मेळाव्यात जिल्ह्यातून 1 हजाराहून अधिक गिरणी कामगार तसेच त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. यामेळाव्यात गिरणी कामगारांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसण म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सविस्तर माहिती देऊन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments