आरोंदा-रेडकरवाडी येथून ५० वर्षीय तरुण बेपत्ता…

2

सावंतवाडी ता.२८: आरोंदा येथून ५० वर्षीय तरुण गेले दोन दिवस बेपत्ता झाले आहेत.दिवाकर सोनू निवजेकर रा.रेडकरवाडी असे त्यांचे नाव आहे.याबाबतची खबर आज त्यांचा मुलगा अमुल दिवकर निवजेकर याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवजेकर हे दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले.दरम्यान अध्याप ते घरी परतले नाही.त्यांच्या नातेवाईकांनी दोन दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांचा थांगपत्ता लागू न शकल्याने आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत ते बेपत्ता असल्याची खबर दिली.त्यानुसार पोलिसात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.

0

4