वैभववाडी, ता. २८ : अरूणा प्रकल्पातील १५० पेक्षा जास्त घरे प्रकल्पात पाणी साठा केल्याने बुडीताखाली गेली आहेत. या प्रकल्पातील ५०० पेक्षा जास्त कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळासमवेत शेतकरी नेते माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी पालकमंत्री दिपक केसरकर यांची शुक्रवारी सावंतवाडी येथे भेट घेवून चर्चा केली.
खा. विनायक राऊत यांनी वैभववाडी येथे येवून अरूणा प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. या आदेशाची अधिकाऱ्यांनी पायमल्ली केल्याची बाब पुष्पसेन सावंत यांनी पालकमंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
मक्तेदाराशी अधिकारी सहमत होवून आणि कमिटीच्या लोकांना हाताशी धरून कमीतकमी दिवसात घळभरणी करून पुनर्वसनाशिवाय धरणात पाणी साठा करून लोकांची घरे पाण्यात बुडवून त्यांना बेघर करण्याचा अधिकार कोणी दिला. ही बाब माजी आ. पुष्पसेन सावंत यांनी केसरकरांच्या निदर्शनास आणून दिली. उध्वस्त झालेल्या अरूणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीपुर्वक लक्ष द्या. अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्या १५ अॉगस्ट दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या अर्धनग्न आंदोलनात सहभागी व्हावे लागेल. असा इशारा सावंत यांनी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने दिला आहे.
घळभरणीपूर्वी प्रकल्पग्रस्तांना त्यांचा संपूर्ण मोबदला, सुसज्ज पुनर्वसन, पर्यायी जमीन उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना प्रकल्प अधिकारी राजन डवरी, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी घळभरणी पूर्ण करून धरणात पाणी साठा केल्याने प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यांच्या घरातील, भांडी, कपडे, धान्य, दागिने, फर्निचर, दस्तऐवज, कागदपत्रे व कुलदेवता या सर्व गोष्टी पाण्याखाली जावून लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी माजी आ. पूष्पसेन सावंत यांच्या शिष्टमंडळात प्रकल्पग्रस्त माजी सरपंच सुरेश नागप, तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, वासुदेव नागप, आरती कांबळे, सुचिता चव्हाण आदींचा समावेश होता.
माजी आ. पुष्पसेन सावंत यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांसमवेत पालकमंत्र्यांची घेतली भेट
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4