वीरपत्नी कनिका रावराणे यांची लष्करात भरती

2

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीदिनी लष्कराकडून नियुक्ती पत्र

वैभववाडी, ता. २८ : शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांची पत्नी कनिका रावराणे यांची भारतीय लष्करात भरती होणार असून त्यांना नियुक्तीच पत्र लष्कराकडून देण्यात आले. येत्या ऑक्टोबर पासून त्या सैन्यात रुजू होणार आहेत. कौस्तुभ रावराणे यांच्या प्रथम स्मृतिदिना दिवशी त्यांना लष्कराकडून पत्र देण्यात आले.
दि. ६ अॉगस्ट २०१८ रोजी पाकिस्तानातून काश्मीर मार्गे हिंदूस्थानात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वैभववाडीचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वयाच्या २९ व्या वर्षी वीरमरण आले. पाकिस्तानी लष्करांने उखळी तोफा डागून या दहशतवाद्यांना कव्हर दिले होते. तोफांचा मारा आणि बेछुट गोळीबारातही मेजर राणे यांनी पराक्रमाची शिकस्त केली. घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या धुमश्चक्रीत राणे यांच्यासह तीन जवान शहीद झाले होते.
मेजर कौस्तुभ राणे मुळचे वैभववाडीचे सुपुत्र त्यांचे घर मीरा रोड येथील शीतल नगरातील हिरल सोसायटीमध्ये आहे. त्यांच्या पश्चात्य आई, वडील, पत्नी आणि अडीच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. गतवर्षी कौस्तुभ राणे यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी लेप्टनंट, कॕप्टन अशी पदे भूषविली. त्यानंतर त्यांना मेजर पदावर बढती मिळाली होती.

4