Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याप्रियकराच्या मदतीने पत्नीने केले पतीवर चाकूने वार

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केले पतीवर चाकूने वार

फोंडाघाट नाथ पै नगर येथील घटना : पती जखमी, उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

कणकवली, ता. २८ : तालुक्यातील फोंडाघाट नाथ पै नगर येथे पतीवर पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने चाकूने वार केले. यात पती गणेश बापू कुबडे (वय 38) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. चाकूने वार करणारी पत्नी अंजली कुबडे (वय 37) आणि तिचा प्रियकर गणेश गायकवाड यांच्यावर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी कलम 307, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
फोंडाघाट नाथ पै नगर येथील गणेश कुबडे यांची पत्नी अंजली कुबडे ही गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या काकाकडे राहत होती. पत्नीला घरी आणण्यासाठी गणेश कुबडे आज (ता.28) सकाळी सहाच्या सुमारास गेले असता पत्नी अंजली आणि तिचा प्रियकर गणेश गायकवाड यांनी भांडण केले. यात गणेश कुबडे यांनी प्रियकराला सुनावले. आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तुझे काय काम असे सांगून त्याला तेथून जाण्यास सांगितले. मात्र तेथून गेलेला गणेश गायकवाड हा घरातून कुराड घेऊन बाहेर आला. ते पाहून गणेश कुबडे तेथून पळून गेला. मात्र गणेश गायकवाड याने आपली प्रेयसी अंजली हिला घेऊन मोटारसायकल वरून तिचा पाठलाग केला. फोंडाघाट गांधी चौकात पळत असलेल्या गणेश कुबडे याला या दोघांनी पकडले. यात पत्नी अंजली हिने पती गणेश कुबडेच्या हातावर, पाठीवर चाकूने 11 वार केले. यावेळी तेथे आलेले ग्रामस्थ सुभाष वेंगुर्लेकर यांनी भांडण सोडविले आणि जखमी गणेश कुबडे याला उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे दाखल केले.
उपचार घेतल्यानंतर सायंकाळी पती गणेश कुबडे याने पत्नी अंजली आणि तिचा मित्र गणेश गायकवाड यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिस या दोहोंचा शोध घेत आहेत. गणेश कुबडे आणि अंजली यांच्या विवाहाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलगे आणि आठ महिन्यांची एक मुलगी आहे. ही तीनही मुले सावंतवाडी येथील अंकुर बालसुधारगृहात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments