विज्ञानाने मानवी जीवन सुखदायी व आनंदी बनले…

15
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एस.व्ही. नाईक; बांदा केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी मांडल्या लक्षवेधी विज्ञान प्रतिकृती…

बांदा,ता.०३: विज्ञानाने लावलेल्या विविध शोधामुळे मानवी जीवन हे आनंदी व सुखदायी बनले असून विद्यार्थ्यांनी निसर्गातील प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे असे मत सेवानिवृत होणारे बांदा कॉलेजचे प्राध्यापक श्री. शरद वासूदेव नाईक यांनी बांदा केंद्र शाळा येथे शाळा पातळीवर आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा येथे पहिली ते सातवी विद्यार्थ्यासाठी विज्ञान प्रतिकृती तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवून प्रदर्शन मांडले होते या प्रदर्शनात शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या लक्षवेधी प्रतिकृती मांडल्या होत्या.

बांदा केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त होणारे प्राध्यापक शरद नाईक यांच्या हस्ते झाले यावेळी शरद नाईक यांचा सेवानिवृत्त बद्दल शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक , उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी स्पंदन फौंडेशनचे अध्यक्ष सिध्देश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक श्री जे.डी.पाटील तर आभार पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी उपशिक्षिका रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस , रंगनाथ परब, प्रशांत पवार, गोपाळ साबळे यांनी परिश्रम घेतले.

\