कोलगावातील युवकाचा अलिबाग समुद्रात बुडून मृत्यू

2

सावंतवाडी,ता.२९: कोलगाव नाईकबाग येथील युवकाचे अलिबाग येथील समुद्रात बुडून निधन झाले.अमेय रवींद्र चौगुले (वय १८) असे त्याचे नाव आहे.ही घटना काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचे पार्थिव आज दुपार पर्यंत सावंतवाडीत आणण्यात येणार आहे. संबंधित युवक हा मुंबई डोंबिवली येथे कामानिमित्त राहत होता.काल सुट्टी असल्यामुळे तो अलिबाग येथे आपल्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी समुद्रावर गेला होता. मात्र मौज मजा करताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात गेला व बुडाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मित्राने पाण्यात याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही अखेर त्याचा मृतदेह काल उशिरा मिळाला. याबाबतची माहिती कोलगाव भाजपाचे बुथ अध्यक्ष सुरज दळवी यांनी दिली. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. अमेय हा गावात मनमिळाऊ म्हणून परिचित होता.

17

4