Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्लेत "उत्सव रानभाज्यांच्या" उपक्रमात विविध रानभाज्यांच्या पाककृती लक्षवेधी

वेंगुर्लेत “उत्सव रानभाज्यांच्या” उपक्रमात विविध रानभाज्यांच्या पाककृती लक्षवेधी

‘माझा वेंगुर्ला‘ चे आयोजन : वेंगुर्लेवासीयांचा उदंड प्रतिसाद

वेंगुर्ले.ता,२९:आजूबाजूच्या परिसरात विविध रानभाज्या आढळतात. त्यामध्ये बऱ्याच रानभाज्या या औषधी असतात. अशा औषधी रानभाज्यांचे महत्व सर्वांना समजावे आणि त्याचे संवर्धन व्हावे यासाठी ‘माझा वेंगुर्ला‘ने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यामध्ये सर्वांनी हिरहिरीने भाग घ्यावा असे आवाहन कणकवली येथील वनश्री प्रा.बाळकृष्ण गावडे यांनी वेंगुर्ला येथे ‘उत्सव रानभाज्यांचा‘या कार्यक्रमात केले. माझा वेंगुर्लेच्या या उपक्रमालाही वेंगुर्लेवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी विविध रानभाज्यांच्या पाककृती लक्षवेधी ठरल्या.
वर्षा ऋतुच्या आगमनाबरोबर कोकणातल्या जंगल आणि दऱ्याखोऱ्यात उमलून येणाऱ्या असंख्य रानभाज्यांची पारंपारीक महती व त्यांना दुर्मिळ रानमोडी चव असते. याच अल्पपरिचीत रानभाजांचे औषधी महत्व, उपयोग आणि त्यापासून बनवता येणाऱ्या चवदार पाककृती याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी ‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे सलग तिसऱ्या वर्षी आज ‘उत्सव रानभाज्यांचा‘ हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.बाळकृष्ण गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर वसुंधरा सेंटरचे सुनिल चोरगे, प्रा.धनश्री पाटील, संजय पुनाळेकर, अशोक दाभोलकर व‘माझा वेंगुर्ला‘चे अध्यक्ष निलेश चेंदवणकर उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान घेतलेल्या रानभाजांच्या पाककला स्पर्धेत ४८ स्पर्धकांनी सहभाग घेत दुर्मिळ रानभाजांची पाककृती तयार करुन आणली.
डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी उपस्थितांना स्लाईड शोद्वारे परिसरात मिळणाऱ्या व दुर्मिळ तसेच अपरिचित असलेल्या रानभाजांची माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की,वनस्पतीशिवाय आपण जगू शकत नाही. वनस्पतीमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे वनस्पती तोडत असताना प्रत्येकाने आपल्या श्वासाची किमत मोजा. पश्चिम घाटावर सर्वात जास्त वनस्पती आहेत. ३५० वनस्पती अशा आहेत की, ज्या फक्त सिधुदुर्गातच सापडतात. अन्यत्र त्या सापडत नाहीत. ११०० द्वीदल व ६००च्यावर एकदल वनस्पती आहेत. २०० वनस्पती या औषधी असून वैद्य त्यांचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे, तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, महाराष्ट्र कॅश्यू मॅन्यूफॅक्चरर्सचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, काजू उद्योजक परशुराम वारंग, मच्छिमार नेते वसंत तांडेल,चित्रकार प्रा.सुनिल नांदोसकर, मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, नागरी कृती समितीचे सदस्य सतिश डुबळे यांच्यासह ‘माझा वेंगुर्ला‘चे पदाधिकारी उपस्थित होते. रानभाज्यांच्या पाककृतीमध्ये इतर रानभाज्यांबरोबरच भारंगी मासे,पितांबी वडी, सात्विक पेव खीर,भारंगीचे मोदक, चुरण कंदमुळ कबाब,गुळवेलीचे लाडू व चुर्ण, दुर्वांचे मोदक व सरबत यांनी लक्ष वेधून घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments