काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती ३१ जुलैला होणार सावंतवाडीत

2

सिंधुदुर्ग,ता.२९: राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्वे २८८ विधानसभामतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखात घेतल्यांनतर आता काँग्रेसनेही सोमवारपासून मुलाखतीचा कार्यक्रम आखला आहे. राज्यातील सर्वे जागांसाठी काँग्रेसतर्फे मुलाखती घेण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्हातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी ३१ जुलै रोजी सावंतवाडी येथे सकाळी ११.वा पक्षनिरिक्षक गुलाबराव घोरपडे,सदाशिवराव मोरे हे निरिक्षक मुलाखती घेणार आहेत.
नवे प्रदेशाच्या बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गुरूवार २५ जुलै रोजी उपस्थितीत बैठक झाली.या बैठकीत जिल्ह्यातील वस्तुस्थितीचा पाढा वाचण्यात आला. काही ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेश अध्यक्षांसमोर जिल्हयातील वास्तव चित्र स्पष्ट केले. काँग्रेस या जिल्ह्यात अस्तिवासाठी लढत आहे.काळासोबत काँग्रेसला या जिल्हयातील प्रभाव टिकून ठेवता आला नाही.तरीपण काँग्रेसच्या मंडळींनी जिल्ह्यात पक्ष जिवंत ठेवला आहे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसला या जिल्हयात विजय मिळवून देणार्‍या चेहर्‍याचा शोध राहणार आहे त्यासाठी विधानसभा निवडणूक प्रभावशाली व निवडणूक प्रभावशाली व निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. दरमान्य कणकवलीमधून नारायण उपरकर कुडाळ-मालवणमधून माजी आमदार पुष्पसेन सावंत काका कुडाळकर, सावंतवाडीमधून विकास गावडे,बाळा गावडे, दीलीप नार्वेकर आदी उमेदवार इच्छुक असल्याचे समजते.

4