वैभववाडी तालुक्यात 230 मि.मी. पावसाची नोंद

129
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी, ता. २९ : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 230 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 62.32 मि.मी पावसाची नोंद झाली असून 1 जून 2019 ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 2155.60 मि.मी पाऊस झाला आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 48 (2398), सावंतवाडी 77 (1915), वेंगुर्ला 18.6 (2498.86), कुडाळ 30 (1970), मालवण 09 (1823), कणकवली 58 (2361), देवगड 28 (1800), वैभववाडी 230 (2479) पाऊस झाला आहे.

\