चट्टोपाध्याय वेतनश्रेणी अभावी शिक्षकांचे आर्थिक नुकसान

2

10 ऑगस्टपर्यंत मंजूर न झाल्यास आंदोलन

सिंधुदुर्गनगरी, ता. २९ : चट्टोपाध्याय वेतनश्रेणी मंजूर न केल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. सातव्या वेतन आयोगात अपेक्षित वाढ मिळालेली नाही. 10 ऑगस्ट पर्यंत हा प्रस्ताव मंजूर न केल्यास आंदोलन करणार असा इशारा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष के टी चव्हाण, राज्य संघटक प्रशांत पारकर, राजा कविटकर, एकनाथ कुर्लेकर आदी उपस्थित होते. यावेळी आंबोकर यांनी चट्टोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्ताव एप्रिल 2019 मध्ये पाठविण्यात आला आहे, असे सांगितले. यावेळी डीसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन अयोगाप्रमाणे मिळणारी फरकाची रक्कम रोखीने मिळावी. देवगड, कणकवली, सावंतवाडी या तालुक्यांनी तशी मागणी केलेली नाही. ती मागणी करून घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. माध्यमिक कडून प्राथमिककडे वर्ग झालेल्या शिक्षकांची जीडीपी कपात लवकरच केली जाईल, असे यावेळी आंबोकर यांनी सांगितले.

1

4