दोडामार्ग, ता. २९ : सोनावल गावचे श्री सातेरी भुतनाथ मंडळ संचलित मुंबई यांच्यामार्फत आज २९ जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या निमित्ताने माध्यमिक विद्यालय सोनावल विद्यालयातील मार्च २०१९ च्या दहावी परिक्षेतील पहिले तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
सोनावल गावचा सुपुत्र कृष्णराज बाबुलनाथ गवस ८ वी शिष्यवृत्तीमध्ये दोडामार्ग तालुक्यात प्रथम आला. याबद्द्ल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रधुनाथ सोनवलकर मंडळाचे सदस्य यांनी प्रास्ताविक करुन मंडळाचे कार्यक्रमाचे उदिष्ट व हेतु सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण गवस यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आपल्या गावातील माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळेतील मुलांसाठी विविध प्रोत्साहनपुर्वक उपक्रम करून मुलांच्या उज्ज्वल भविष्यातील वाटचालीस सहकार्य करु. ९ वी व १० वीच्या गरजु मुलांसाठी पाठ्यपुस्तक देणार अशी ग्वाही दिली. या कार्यकमास तेरवणमेढे संरपच सौ. प्रियांका सोनवलकर यांनी शुभेच्छा दिल्या. माध्यमिक शाळाचे मुख्याध्यापक नंदकिशोर म्हापसेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यकमास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सौ. विशाखा खांबल, सगुण गवस, विठ्ठल पाडलोस्कर, वामन गवस सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.