कोकण प्रवासी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सावंतवाडी, ता. २९ : गाैरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रेल्वेची आढावा बैठक आयाेजीत करावी अशी मागणी भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री यांना कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत, कल्याण सावंतवाडी पॅसेंजर समितीचे अध्यक्ष सुनिल उतेकर ,अभिमन्यू लोंढे, भाजपा तालुका अध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक आनंद नेवगी, दादु कविटकर यांच्या उपस्थितीत निवेदन दिले.
भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देवुन गाैरी-गणपती सणाच्या काळात प्रवासी वाहतुकीचा ताण पडणार आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असून ते अद्यापि अधेॅवट आहे. त्यामुळे गणपती सणासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांची मोठी अडचण होणार आहे याकडे लक्ष वेधले. काेकण रेल्वेमार्गावरील प्रवास सुखकर व्हावा म्हणून एक आढावा बैठक घ्यावी.त्यात काेकण रेल्वे,मध्य व पश्चीम रेल्वे अधीकार्यांना निमंत्रीत करावे असे म्हटले आहे.
कोकण संघटनेच्यावतीने रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या मागण्यांचे एक निवेदन यावेळी मुख्यमंत्र्याना सादर करण्यात आले. तुतारी एक्सप्रेस २४ डब्यांची व्हावी त्यात जनरल व महिलांसाठी डबा असावा तसेच सावंतवाडी-दिवा पँसेजर बावीस डब्यांची व्हावी अशी मागणी केली.
जनशताब्दी तीरुनवेली एक्सप्रेस ,तेजस एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस ,मत्स्यगंधा, संपर्क क्रांति, मुंबई बेंगलोर सुपरफास्ट, अशा रेल्वे ना सावंतवाडी,कुडाळ, कणकवली येथे थांबे देण्यात यावे अशी देखील मागणी केली आहे.
कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या दिवा स्थानकावर थांबवाव्यात तसेच वांद्रे-सावंतवाडी बारमाही सुरू करावी,शिडीेॅ-कल्याण-सावंतवाडी रेल्वे सुरू करावी, मुंबई-सावंतवाडी व सावंतवाडी -मुंबई पॅसेंजर रात्राैच्या वेळी सोडावी, कल्याण –सावंतवाडी व सावंतवाडी-कल्याण पॅसेंजर सोडावी व डहाणू -सावंतवाडी व सावंतवाडी डहाणु अशी गाडी साेडावी अशी मागणीदेखील करण्यात आली.
गणेश चतुथीेॅ,दिवाळी, होळी सण ,आगंणेवाडी जत्रा यांच्या काळात रेल्वे गाड्या साेडाव्यात व त्याचे आरक्षण दोन महिने अगाेदर करावे असे देखील या निवेदनात म्हटले आहे. मुंबई -रत्नागिरी पॅसेंजर सकाळी सोडावी. एनाेॅकुलम कल्याण मार्गे सोडावी अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिल्ली दरबारी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यामार्फत रेल्वेमंत्री यांना देखील सादर केले आहे.