मालवण, ता. २९ : मुंबई- दादर हिंदू कॉलनी येथील दिगंबर पाटकर गुरुजी विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आणि नॅशनल तायक्वॉदो कराटेपटू निशा प्रमोद सोलकर हिने पुणे येथे पार पडलेल्या चौथ्या ओपन नॅशनल तायक्वॉदो स्पर्धा २०१९ मध्ये कॅडेट ४७ किलोग्रॅम गट मध्ये कांस्य पदक पटकावले.
खर्डी स्पोर्ट क्लब पुणे आणि होरानगी तायक्वॉदो असोसिएशन पुणे पुरस्कृत पुणे येथील भिकू पाठारे स्टेडियम येथे चौथी ओपन नॅशनल तायक्वॉदो स्पर्धा पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रामगड गावची होळीवाडीची कन्या आणि दिगंबर पाटकर गुरुजी विद्यालय दादर येथे शिक्षण घेणारी इयता आठवीची विद्यार्थिनी आणि परेल येथील प्रसिद्ध अशा चिल्ड्रन तायक्वॉदो अकॅडमीमध्ये निशा सोलकर ही कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. चौथी ओपन नॅशनल तायक्वॉदो चॅम्पियनशिप २०१९ ही मानाची अशी स्पर्धा समजली जाते आणि निशाने या स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवून आपल्या शिरपेचात मानाचा असा तुरा खोवला आहे.
निशा सोलकर हिला प्रशालेच्या प्राचार्य प्राची बोरकर, वर्ग शिक्षिका श्रीमती मटकर, श्रीमती विजया सरगर, कराटेचे मुख्य प्रशिक्षक सिद्धेश जाधव, संकेत भोसले, स्नेहल भोईटे, स्पोर्ट्स शिक्षक प्रकाश दांडेकर, कमलाकर रेडी, वडील प्रमोद सोलकर, आई पूजा सोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या अगोदरही निशा हिने विविध शालेय, जिल्हा, राज्य, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली आहेत. अनेक नृत्य स्पर्धेतही निशाने पदके प्राप्त केली आहेत. दशावतार नाटकातूनही निशाने अभिनयाची चुणूक दाखवली आहे. निशा सोलकर हिला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळविले आहे. निशा हिचे मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जि. प. सदस्य मसुरे सरोज परब, प. स. सदस्य गायत्री ठाकुर, कामगार नेते मुंबई जयवंत परब, अखिल भारतीय कॅरम फेडरेशचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक दीपक परब, मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव दीपक सावंत यांनी अभिनंदन केले आहे. रामगड, मुणगे, मसुरे गावात निशा हिचे कौतुक होत आहे.
आजचे मिळालेले यश माझे नसून तुम्हा सर्वांचे आहे. यापुढे मी आणखीन जोमाने कष्ट, मेहनत करून माझी प्रगती करेन आणि माझ्या भूमीचे, शाळेचे, पालकांचे, सर्व मार्गदर्शक गुरुजनांचे, रामगड, मुणगे, मसुरे गावचे नाव उज्ज्वल करेन असे मत निशा सोलकर हिने व्यक्त केले.
रामगडच्या निशा सोलकरला नॅशनल तायक्वॉदो स्पर्धेत कांस्यपदक…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES