बांदा-निमाजगा येथे बांबूने मारहाण केल्याने एकजण गंभीर जखमी

2

पार्टी करताना प्रकार : दोघांविरोधात गुन्हा दाखल

बांदा, ता. २९ : बांदा-निमजगा येथे पार्टी करताना झालेल्या भांडणातून बांबूने मारहाण केल्याप्रकरणी गुरुप्रसाद गडेकर (वय ३२) हे गंभीर जखमी झालेत. याप्रकरणी गुरुप्रसाद यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार बांदा पोलिसांनी शिवाजी नाईक (वय ३५) व सागर नाईक (वय २८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना आज सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले. त्यांना उद्या मंगळवारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव करत आहेत.

18

4