सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटात खांदेपालट…

45
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सतीश सावंत, संदेश पारकर नवे जिल्हाप्रमुख; रावराणेंकडे जिल्हा सहसंपर्कपद…

मुंबई, ता.०९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आले आहेत. यात जिल्‍हा सहसंपर्कप्रमुखपदी अतुल रावराणे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.
याखेरीज जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघाचीही जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. यात कणकवली विधानसभेची जबाबदारी जिल्‍हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे, कुडाळ-मालवण संजय पडते आणि सावंतवाडीची जबाबदारी संदेश पारकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्‍याची माहिती शिवसेना सुत्रांकडून देण्यात आली.

\