नाटळ येथील गडनदीपात्रानजीक मृतदेह सापडला

41
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

कणकवली,ता. ९ ः गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेले हरकुळ खुर्द येथील मधुकर नारायण मलये (वय ७५) यांचा मृतदेह सापडाला आहे. आज सकाळच्या नाटळ येथील गडनदी पात्राच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेऊन मयत स्थितीत त्याच्या मतदेह सापडाला. मृतदेह बराचसा कुजलेल्या स्थितीत होता. मात्र, अंगावरील कपड्यामुळे श्री. मसये यांची ओळख पटली आहे. नाटळ येथील नदीपात्रानजीक एक मृतदेह सडलेल्या स्थितीत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. याबाबतची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बेपत्ता मलये यांच्या कुटुंबियांनाही बोलविण्यात आले. त्यांनी मृतदेह मधुकर मलये यांचा तो मृतदेह असल्याचे सांगितले केले.

\