दोडामार्ग-हळबे महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा….

19
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग ता. ०९: येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. संध्या प्रसादी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, स्त्रीने विचार केला तर ती सर्व ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते. स्वतःचा व्यवसाय सांभाळून इतर महिलांना रोजगार देऊ शकते. आज महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तम रित्या काम करून नावलौकिक मिळवत आहेत. कुटुंबातील एक स्त्री शिक्षित झाली तर ती सर्व कुटुंबाला शिक्षित करू शकते. आज बचत गटाद्वारे महिला एकत्र येऊन अनेक व्यवसाय करत आहेत. यापुढेही महिला प्रत्येक क्षेत्रात काम करून देशाचे नाव जगात उंचावेल यात शंका नाही.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला दिनाचा इतिहास सांगितला. तसेच महिला बचत गटाचे महत्व पटवून दिले. महिलांची कार्यक्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते. महिला घर सांभाळून देखील पुरुषांच्या बरोबरीने कार्य करू शकतात. महिलांनी ग्रामपंचायत, जिल्हापरिषद पासून राष्ट्रपती पदापर्यंत आज भरारी घेतली आहे. अशा सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिती प्रसादी हिने केले. कु. साक्षी गवस हिने सूत्रसंचालन तर आभार कु. महिमा गवस हिने मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

\