दांडी स्मशानभूमीतील लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पूर्ण…

13
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माजी नगरसेवक सादये, परब, मयेकर यांनी मानले मुख्याधिकाऱ्यांचे आभार…

मालवण, ता. ०९ : दांडी स्मशानभूमीत जीर्ण झालेले लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम मार्गी लागल्याने स्थानिक माजी नगरसेवकांनी पालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासनाचे आभार मानले आहेत.
शहरातील दांडी येथील स्मशानभूमीतील अंत्यविधीचे लोखंडी खांबांची दुरवस्था झाली होती. नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी स्थानिक नगरसेवक पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हे खांब बदलण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

\