मालवण तहसील कार्यालय परिसरातील निवारा शेड मोजतेय अखेरची घटका…

175
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २९ : येथील तहसील कार्यालय परिसरातील पोलिस ठाण्यालगतची शेड अखेरच्या घटका मोजत आहे. जीर्ण झालेल्या या शेडचा पत्रा आज सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेला.
पोलिस ठाण्याला लागूनच अधिकारी, तक्रारदार, पत्रकार, सर्वसामान्य यांना बसण्यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक शेड काही वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. मात्र ही शेड जीर्ण झाल्याने ती केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. यात दोन महिन्यांपूर्वी बैठक व्यवस्था तुटून पडली होती. त्याची डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर आज सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या शेडचा जीर्ण झालेला लोखंडी बार पत्र्यासह उडून गेला. अखेरच्या घटका मोजत असलेल्या या शेडच्या दुरुस्तीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.

\