सिंधुदुर्गनगरी,ता.३० : जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक डॉ मेधा वाके यांची मुंबई येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ येथे उपनिबंधक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बदली झाली आहे. डॉ वाके या जून 2016 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, त्यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या जागेवर नवीन नियुक्ती देण्यात न आल्याने हे अधिकारी पद रिक्त राहणार आहे.
राज्य शासनाच्या सहकार विभागाने सहकारी संस्था गट अ दर्जाच्या 19 अधिकाऱ्यांच्या नियमानुसार बदल्या केल्या आहेत. तर दोन अधिकाऱ्यांना कार्यरत ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तीन वर्षाचा कालावधी झाल्याने डॉ वाके यांचीही बदली करण्यात आली आहे.
जिल्हा सहकारी संस्था विभागात अधिकारी व कर्मचारी यांची वानवा असताना डॉ वाके यांनी चांगला कारभार हाकला. जिल्ह्यातील सहकार वाढवा, सहकाराला शिस्त लागावी, यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये डॉ वाके यांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्यात या योजनेबाबत ओरड होवू शकली नाही. तसेच त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. राज्य शासनाने ज्या संस्थाना पतपुरवठा केला होता. त्याच्या वसुलीसाठी त्यांनी कडक धोरण राबविले. अटल महापणन योजने अंतर्गत जिल्ह्यातील संस्थाना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी 30 प्रस्ताव शासन दरबारी पाठविले आहेत. एकंदरीत डॉ वाके यांची कारकीर्द जिल्ह्यासाठी चांगली झाली आहे.
सहकारी संस्था उपनिबंधक मेधा वाके यांची बदली | रिक्त जागी नविन नियुक्ती नाही
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES