दोन्ही चालकात बाचाबाची; सावंतवाडी पोलीसात धाव…
सावंतवाडी ता.३०: रिक्षा व बुलेट यांच्यात समोरासमोर झालेल्या जोर-दार धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.हा अपघात आज दुपारी ११:०० वाजण्याच्या सुमारास येथील शासकीय विश्राम गृह परिसरात घडला.दरम्यान संबंधित दोन्ही वाहनचालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा सर्व प्रकार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गेला.
या अपघाताची माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.तर धूम स्टाईल बाईक चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी,अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.