बांदा-दाणोली रस्त्यावर बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

2

बांदा/प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुलि तपासणी नाका पथकाने बांदा-दाणोली रस्त्यावर सुभेदार हॉटेल नजीक बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई केली. यामध्ये गोवा बनावटीच्या दारुसह एकूण ७ लाख २६ हजार ३७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हेमंत अशोक मेतर (वय ४८, रा. कोळंब, ता. मालवण) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पथकाला दारू वाहतुकीची माहिती मिळाल्याने बांदा-दाणोली रस्त्यावर सुभेदार हॉटेल नजीक सापळा रचण्यात आला होता. बांद्याहुन दाणोलीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला (एमएच ०७ एजे १००८) तपासणीसाठी थांबविण्यात आले. गाडीच्या मागील हौद्यात मासे वाहतूक करणारे २० क्रेट होते. त्याखाली गोवा बनावटीच्या दारुचे ३३ खोके बेकायदा आढळले. पथकाने ३ लाख ७२ हजार ३७२ रुपये किमतीची दारू व साडेतीन लाख रुपये किमतीचा टेम्पो ताब्यात घेतला. ही कारवाई प्रभारी निरीक्षक एन. पी. रोटे, दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, रमेश चांदूरे, शरद साळुंखे, संदीप कदम यांनी केली.

23

4