सावंतवाडीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल…

6
2

सावंतवाडी,ता.१४: शहरातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. हा प्रकार सकाळी लक्षात आला. त्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या खबरीनुसार तीचे अपहरण झाल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित मुलगी ही मूळ कर्नाटकची आहे. तिचे वडील शहरा लगतच्या एका गावात गवंडी काम करतात. ती त्यांच्यासोबत मोलमजुरी करत होती. आज अचानक ती बेपत्ता झाल्याचे तिच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सावंतवाडी पोलीस त्या मुलीचा शोध घेत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.

4