अपघातास कारणीभूत ठरणारी “ती” उघडी गटारे बंदिस्त करा…

4
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सामाजिक बांधिलकीची मागणी; सार्वजनिक बांधकामला निवेदन सादर…

सावंतवाडी,ता.१३: येथील वेंगुर्ला बस स्टॅन्ड समोरील उघडे गटार अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फरशा घालून रस्ता रुंद करण्यात यावा व होणारे अपघात रोखावे, अशी मागणी सामाजिक बांधिलकी संघटनेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकामकडे करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या माध्यमातून अधिकारी सिमा गोवेकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव, संजय पेडणेकर, सतीश बागवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्या ठिकाणी लवकरात लवकर फरशा घालण्यात येतील. तसा प्रस्ताव वरिष्ठांच्या सहकार्याने करण्यात येईल, असे आश्वासन गोवेकर यांनी दिले. त्या ठिकाणी फरशा उघडे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नुकतीच एक महिला त्या ठिकाणी पडली होती. तिला गंभीर दुखापत झाली होती. वारंवार अपघात होत असल्यामुळे सामाजिक बांधिलकी संघटनेच्या माध्यमातून ही दखल घेण्यात आली आहे.

\