उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिनचे 1 ऑगस्टला लोर्कापण

138
2

कणकवली, ता.30 ः येथील उपजिल्हा रुग्णालयाला नवीन सोनाग्राफी मशीन उपलब्ध झाली आहे. त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा गुरुवार 1 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता होणार आहे. लोकार्पण सोहळा कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी प्रभारी तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी मनोज भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांनी केले आहे.

4