ज्यांना “गुंड” म्हणून हिणवले त्यांनाच निवडून आणण्याची आता केसरकरांकडून भाषा…

2

राजन तेली; सत्तेसाठी तुमच्यासारखा “मी” कुठेही आयत्या बिळावर नागोबा होऊन बसलो नाही…

सावंतवाडी,ता.१४: माझ्या पासून ज्यांना- ज्यांना “गुंड” म्हणून हिणवले त्यांच्या नावाने उदो-उदो केला. त्यांनाच आता निवडून आणण्याची भाषा दीपक केसरकर करीत आहेत. त्यामुळे आता दहशतवाद संपला का? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान मी पदासाठी कधी लाचारी केली नाही. सत्तेसाठी केसरकरांसारखा कुठेही आयत्या बिळावर नागोबा होऊन बसलो नाही. मात्र त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी नारायण राणे, शरद पवार आणि आता उध्दव ठाकरे यांना शिव्या घालण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचे राजकारण हे स्वार्थीपणाचे आहे, असा आरोपही यावेळी श्री. तेली यांनी केला. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

442

4