राजा शिवाजी मित्र मंडळाच्या उपाध्यक्षपदी अरुण घाडी…

8
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.,ता.१४: येथील राजा छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या उपाध्यक्षपदी अरुण गाडी यांची निवड करण्यात आली आहे. तर यावर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सावंतवाडी येथील ओंकार कला मंचचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंडळाची बैठक माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष बंटी माटेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी मंडळाचे सल्लागार सुरेश भोगटे, सचिव दीपक सावंत, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, महादेव राऊळ, ज्येष्ठ व्यापारी आनंद रासम, मुकेश पटेल, सुंदर गावडे, वासुदेव खानोलकर, राजेंद्र सांगेलकर, प्रदीप नाईक, शुभम मलकाचे, मंडळाचे जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे, मंडळाचे माहिती अधिकारी रवी जाधव उपस्थित होते.

\