सिंधुदुर्गनगरी, ता. ३० : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून दोडामार्ग, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांमध्ये 100 मि.मी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 80.77 मि.मी पावसाची नोंद झाली असून 1 जून 2019 ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 2236.38 मि.मी पाऊस झाला आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 123 (2521), सावंतवाडी 99 (2014), वेंगुर्ला 42.2 (2541.06), कुडाळ 134 (2104), मालवण 10 (1833), कणकवली 109 (2470), देवगड 20 (1820), वैभववाडी 109 (2588) पाऊस झाला आहे.
यंदाच्या वर्षी आतापर्यंत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 2588 मि.मी. एकूण पाऊस झाला असून त्या खालोखाल 2541.06 मि.मी. वेंगुर्ला आणि 2521 मि.मी. दोडामार्ग तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. तर किनारपट्टीवरील मालवण आणि देवगड तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.
घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कळे – मांडुकली परिसरात रस्त्यावर पाणी आल्यामुळे वैभववाडी – कोल्हापूर मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वैभववाडी – गगनबावडा मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहतूक फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.