तळवडे-काळेवाडी येथे शेत विहिरीत आढळली भली मोठी मगर…

2

सावंतवाडी,ता. १४: तालुक्यातील तळवडे-काळेवाडी येथील नारायण काळे यांच्या शेत विहिरीमध्ये भली मोठी मगर आढळून आली. याबाबतीत माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी “त्या” मगरीला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

सावंतवाडी वन क्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रमोद राणे , वनरक्षक रमेश पाटील , वन कर्मचारी बबन रेडकर , वैशाली वागमारे , यांनी मगरीला सुरक्षितरित्या पकडली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ रेडकर, धुरी, सपकाळ, मोर्ये, बुगडे व दळवी यांनी त्यांना मदत केली .

329

4