वेंगुर्ले-वायंगणी येथील पैठणीच्या खेळात वर्षा धोंड विजेत्या…

2

स्वयंभू महिला ग्रामसंघाचे आयोजन; संचिता कामत उपविजेत्या…

वेंगुर्ले,ता.१४: वायंगणी येथील स्वयंभू महिला ग्रामसंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पैठणीच्या खेळात सौ. वर्षा यशवंत धोंड विजेत्या ठरल्या. उपविजेते पारितोषिक सौ. संचिता सतीश कामत यांनी पटकाविले. दरम्यान तृतीय क्रमांकाचे बक्षीस मानसी मिलिंद मयेकर यांना देऊन गौरविण्यात आले. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा घेण्यात आली होती.

स्वयंभू महिला ग्रामसंघाच्या वतीने काल दिवसभरात महिलांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी महिलांचे नृत्यविष्कार, फुगड्या, तसेच फनी गेम आदी कार्यक्रम संपन्न झाले. यात खास आकर्षण असलेला शुभम क्रिएशन प्रस्तुत पैठणीच्या खेळाने वेगळीच रंगत आणली. या खेळात ४० महिला सहभागी झाल्या होत्या. त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते घोषित करून त्यांना मानाची बक्षिसे देण्यात आली. यातील मानाची पैठणी सिद्धेश कोचरेकर यांनी पुरस्कृत केली होती. पैठणी खेळाचे निवेदन शुभम धुरी यांनी केले.

554

4