आंबा,काजू बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण…

17
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१४: महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति सन्मान योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत. या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, फळ पिक उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून आपल्या कर्जमाफी च्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करून , निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले आहेत. तरी शासनाकडून त्याची दाखल घेतलेली नाही.आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु करून शासनाचे लक्ष वेधले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू हंगामामध्ये फळांना फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते, दिलेल्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईत सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नाही एवढे भयंकर संकट बागायतदार शेतकऱ्यांवर आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रूपये मदत द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र शासन स्तरावरून त्याची काहीच कार्यवाही झालेली नाही. जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी संघटनेच्या वतीने शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच आंदोलन, उपोषण छेडून सुद्धा खावटी कर्जदारांना व दोन लाखावरील कर्जदारांना अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील सन २०१४ ते २०१९ मधील २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. तसेच २०१४ पासून खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. अल्पभूधारक व मध्यम मुदतीची कर्जे कोविड कालखंडात भरता आलेली नाहीत, यावर कर्जमाफी मिळावी.
शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अश्या शेतकऱ्यांना कर्जातुन मुक्त करावे.आदी मागण्या कड़े शेतकऱ्यांनी उपोषणाद्वारे लक्ष वेधले आहेत.
यावेळी श्यामसुंदर राय, कृष्णा चिचकर, महेश चव्हाण, प्रकाश वारंग, आग्नेय फर्नाडिस, राघोबा नाईक, बाळा नाईक आदी शेतकरी उपोषण करीत आहेत.

\