मडूरेत मगरीकडून गाभण बकरीचा फडशा…

13
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता. १४: मडुरे-मोरकेवाडी येथील शेतकरी विजय गवंडी यांच्या गाभण बकरीवर मगरीने हल्ला करुन फडशा पाडला. बकरींचा कळप पाण्यासाठी नदीवर आला असताना दबा धरुन बसलेल्या मगरीने बकरीवर हल्ला केला. या दुर्घटनेत गवंडी यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पाडलोस वनरक्षक आप्पासो राठोड हे पंचनाम्यासाठी सावंतवाडीहून रवाना झाले आहेत. मगरींच्या दहशतीने शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.  मडुर्‍यातील नदीर शेकडो मगरींचा वावर आहे. गावात मगरींनी पाळीव जनावरांवर हल्ले करण्याच्या गेल्या १० वर्षात अनेक घटना घडल्या आहेत. यात शेकडो पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

\