कसाल येथील मोबाईल व्यावसायिकाचा खून….?

31
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एक नातेवाईक ताब्यात; पोलिसांकडून तपासाची सूत्रे वेगात…

सिंधुदुर्गनगरी,ता.१४: कसाल येथील मोबाईल दुरूस्ती व्यावसायिक सचिन श्रीकांत भोसले (वय ४१) यांचा मृतदेह आज घरामध्ये संशयास्पद रित्या आढळून आला. त्यांच्या कान व नाकातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही

घटना आज सकाळी उघडकीस आली. रात्री त्यांचा घातपात झाला असावा, असा संशय आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या एका नातेवाकाला ताब्यात घेतल्याची समजते. मात्र याबाबत अधिकृत माहिती कळू शकली नाही.

घटनेच्या अधिक माहिती अशी की, हा प्रकार १२ मार्च रोजी रात्री घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस यामागे नेमकं कारण काय ? याचा तपास करत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे शवविच्छेदना नंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकणार आहे. दरम्यान पोलिसांनी मात्र आपल्या तपासाचा वेग वाढविला आहे.

\