कुणकवळे येथील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, वडील जखमी…

17
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सायंकाळची घटना ; आंब्याच्या झाडास धडक बसल्याने अपघात…

मालवण, ता. १४ : मालवणहून – कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने आज सांयकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कुणकावळे ग्रामपंचायत नजीकच्या रस्त्याच्या बाजूच्या आब्यांच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यात दुचाकीस्वार अमित शरद गावडे- (वय-३९) रा. महान हे जागीच ठार झाले तर दुचाकीच्या मागे बसलेले त्यांचे वृद्ध वडील शरद राजाराम गावडे हे किरकोळ जखमी झाले.

याबाबतची माहिती अशी- तालुक्यातील मूळ साळकुंभा येथील रहिवासी शरद राजाराम गावडे हे महान येथे राहतात. आज सायंकाळी शरद गावडे हे आपला मुलगा अमित यांच्याबरोबर दुचाकीने (एम. एच ०४ इव्ही- ३९९५ ) कट्ट्याच्या दिशेने जात असताना कुणकावळे येथील कुपेरीच्या घाटीत एका धोकादायक वळणावर त्यांची दुचाकी आली असता रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्यांच्या झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शरद गावडे हे रस्त्यावर फेकले गेल्याने जखमी झाले तर दुचाकीस्वार अमित यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमी शरद गावडे यांना कुणकावळे ग्रामस्थांनी अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहीकेने जिल्हा रुग्णालयात हलविले. मृत दुचाकीस्वाराची ओळख पटत नव्हती अखेर उशीरा ओळख पटली. मृत अमित आपल्या वडीलांबरोबर दुचाकीवरुन प्रवास करत असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला. मृत अमितचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयाकडे आणण्यात आला.अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलिस सुनिल चव्हाण, जाँयल फर्नाडीस, देवेश प्रभू करत आहेत.

\