आल्याने दिले “आल्यातले”….

2

दोनशे रुपये कीलो:इतर भाज्या मात्र आवाक्यात…

कुडाळ.ता,३१: ऐन पावसाळ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात घट झाली असली. तरी आल्याने मात्र सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सदयस्थिती लक्षात घेता आल्याने ते शंभर रुपये असलेले आले तब्बल दोनशे रुपये किलो झाले आहे. त्यामुळे श्रावण महिन्याच्या तोंडावर आले वापरावर गृहिणी व निर्बंध येणार आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले होते. कोथिंबिरीची जुडी तब्बल ८० रुपये पोहोचली होती.मात्र सद्य स्थितीत लक्षात घेता भाज्यांचे दर बऱ्यापैकी कमी झाले आहेत. यात कोबी, फ्लॉवर दहा ते वीस रुपयाला मिळते. परंतु सर्व भाज्यांच्या दरात “आल्याने” मात्र जोरदार उसळी घेतली आहे.

0

4