विजवितरणच्या अधिकाऱ्यांना सावंतवाडीतील नागरिकांचा घेराव

2

सावंतवाडी,ता.३१: विज बिले जास्त येत असल्यामुळे शहरातील सबनिसवाडा सालईवाडा, माठेवाडातील नागरिकांनी आज वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी वीज रिडींग घेणाऱ्या कंत्राटदाराने दोन महिने मीटरचे रिडींग घेतले नसल्याचा प्रकार उघड झाला. कंत्राटदारावर कारवाई करा तसेच आमची बिले कमी करा अशी मागणी नागरिकांनी केली. त्यावेळी महावितरणचे अधिकारी अतुल पाटील त्यांनी विज बिल कमी करतो तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करतो असे आश्वासन दिले. यावेळी प्रसाद अरविंदेकर, सायबा इंगळे,आनंद सावंत, ऍड अनिल केसरकर, अतुल केसरकर, ऍड राजू कासकर, आशिष सुभेदार तसेच सबनिसवाडा,माठेवाडा,सालईवाड्यातील नागरिक उपस्थित होते.

4