ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचा सन्मान

131
2

वैभववाडी.ता,३०: ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि लातूर जिल्हा शाखा आयोजित दोन दिवशीय राज्यस्तरीय अभ्यासवर्ग दि. २७ व २८ जुलै, २०१९ रोजी औषधी भवन, लातूर येथे संस्थेचे अध्यक्ष डाँ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या माध्यमातून तालुका शाखा स्थापन करणे, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करणे, शाळा/काँलेज विद्यार्थी ग्राहक जागृती कार्यक्रम, ग्राहक जागृती पत्रके वाटप, राष्ट्रीय ग्राहक दिन, जागतिक ग्राहक दिन, ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत योग्य सल्ला व मार्गदर्शन करुन उत्कृष्ट कार्य करीत असलेबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा शाखेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दोन दिवशीय राज्यस्तरीय अभ्यासवर्गात-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचा सन्मान संस्थेचे राज्य अध्यक्ष डाँ.विजय लाड, संघटक श्री.सर्जेराव जाधव, सचिव श्री. अरुण वाघमारे व कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
सन्मानचिन्ह स्वीकारताना जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील, कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर, वैभववाडी तालुका संघटक शंकर स्वामी, सदस्य शैलेंद्रकुमार परब, सौ.अनुजा परब, जयवंत पळसुले, मनोज सावंत, अजय पाटील व इंद्रजित परबते उपस्थित होते.

4