मुलाखती नंतर चित्र स्पष्ट: पुष्पसेन सावंत,दिलीप नार्वेकर,बाळा गावडे,काका कुडाळकर इच्छुक
सावंतवाडी/अमोल टेंबकर
कॉग्रेसच्या माध्यमातून जिल्हयातील तीन विधानसभा लढविण्यासाठी तब्बल सात उमेदवार निवडणुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आज येथे झालेल्या मुलाखती दरम्यान हे चित्र उघड झाले.
यात माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्यासह माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, कार्याध्यक्ष विलास गावडे,प्रांतिक सदस्य बाळा गावडे, काका कुडाळकर यांच्यासह अन्य इच्छूकांनी आपल्याला संधी दयावी अशी मागणी केली. त्यामुळे आता पक्ष नेमकी कोणाला संधी देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज येथिल राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात कॉग्रेस मधून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी पक्ष निरिक्षक तथा पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे पदाधिकारी गुलाबराव जोशी जिल्हाध्यक्ष विकास सावंत,माजी आमदार सुभाष चव्हाण,राजू मसुरकर,जयेंद्र परूळेकर ,विभावरी सूकी,आदी उपास्थित होते.
यावेळी झालेल्या मुलाखत प्रकीयेत सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांच्यासह कार्याध्यक्ष विलास गावडे, आणी प्रांतिक सदस्य बाळा गावडे, यांनी इच्छा व्यक्त केली आहे. तर कुडाळ मालवण मतदार संघासाठी माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्यासह काका कुडाळकर यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघासाठी देवगड येथिल नारायण उपरकर आणी सुशांत राणे यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नेमकी कोणाला उमेदवारी देण्यात येते आणी कॉग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास कोणाचा पत्ता कट होतो. कोणता मतदार संघ कॉग्रेस लढवणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.