वेंगुर्लेत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना २ आँगस्टला होणार किट वाटप

2

राज्यमंत्री संजय भेगडे यांची उपस्थिती

वेंगुर्ले.ता,३१: वेंगुर्ले तालुक्यातील इमारत व बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत अशा कामगारांनी शासनाच्या इमारत व बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना शुक्रवार २ आँगस्ट रोजी वेंगुर्ले येथील साई दरबार हाँल येथे दुपारी ३ वाजता किट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास तालुक्यातील नोदणीकृत बांधकाम कामगारांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदूर्गचे सरकारी अधिकारी रामचंद्र टेंबुलकर यांनी केले आहे.

21

4