सुभाष चव्हाण :आमदार नितेश राणेंचा कॉग्रेसमध्ये येण्याबाबत तुर्तास प्रस्ताव नाही
सावंतवाडी.ता,३१:जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिला होता. मात्र विधानसभा निवडणूका होईपर्यत त्यांनीच या पदावर रहावे अशी कार्यकर्त्याची इच्छा असल्यामुळे तुर्तास तरी त्यांच्या कडे जबाबदारी ठेवण्यात आली आहे. तर त्यांचे काम कार्याध्यक्ष विलास गावडे पाहणार आहेत. अशी माहीती आज येथे आायोजित पत्रकार परिषदेत कॉग्रेसचे जिल्हा पक्ष निरिक्षक तथा माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान आमदार नितेश राणे यांनी पक्षात येण्याबाबतचा अद्याप पर्यत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही.तसेच आजच्या मुलाखत प्रकीयेत त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही.असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
कॉग्रेस मधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज येथे घेण्यात आल्या त्यांनतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री चव्हाण बोलत होते. यावेळी
देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष तथा पक्षनिरिक्षक गुलाबराव घोरपडे,माजी आमदार पुष्पसेन सावंत,विकास सावंत,युवक कॉग्रेसचे शिवराज मोरे,कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री घोरपडे म्हणाले आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणूका लक्षात घेता. या ठीकाणच्या तिन्ही जागा स्वबळावर लढविण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्याकडुन करण्यात आली आहे.अद्याप पर्यत आघाडी करावी की करू नये याबाबत एकमत झालेले नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही या ठीकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. याज तीन जागांसाठी नउ जणांनी इच्छा व्यक्त करून दाखविली आहे. त्याबाबतचा अहवाल वरिष्ट स्तरावर सादर करण्यात येणार आहे.
श्री चव्हाण यांना नव्याने जिल्हाध्यक्ष निवडीबाबत विचारले असता. ते म्हणाले विकास सावंत यांनी आपल्या पदाचा वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिला होता. परंतू विधानसभा निवडणूका होईपर्यत त्यांनीच या ठीकाणी रहावे. अशी कार्यकर्त्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली जबाबदारी तुर्तास कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्याकडे देण्यात येणार आहे. मात्र श्री सावंत हे सुध्दा काम पाहणार आहेत. त्यामुळे तुर्तास तरी बदल होणार नाहीत.
आमदार नितेश राणे कॉग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. याबाबत पदाधिकार्यांना छेडले असता. ते आमच्या संपर्कात नाहीत तुर्तास तरी त्यांनी आमदारकी लढविण्याबाबत प्रस्ताव दिलेला नाही. आजच्या मुलाखत प्रकीयेत सुध्दा ते उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही. आणी नेमका कोणता निर्णय घ्यायचा याबाबतचा निर्णय वरिष्ट नेते घेणार आहेत. त्यामुळे आत्ताच आम्ही काही बोलू शकत नाही. असे चव्हाण यांनी सांगितले.