देवगड-आरे येथील बेपत्ता वृद्धेचा मृतदेह सापडला…

2

देवगड,ता.१८: तब्बल वीस दिवस बेपत्ता असलेली आरे-बौध्दवाडी येथील वैजयंती अशोक मुणगेकर यांचा मृतदेह आज परिसरातील काजू बागेत आढळून आला. मानसिक स्थिती खालावल्याने त्या गेले काही दिवस बेपत्ता होत्या याबाबतची तक्रार ४ तारखेला त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान काल सायंकाळी बौध्दवाडी येथील बागायतदार शिवप्रसाद मुणगेकर यांना त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर जाऊन खात्री केली असता त्यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोटात काही नसल्यामुळे चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

4