राष्ट्रवादीच्या उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी

192
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.३१: राष्ट्रवादीच्या उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्षपदी सावंतवाडी येथील पुंडलिक दळवी यांची आज निवड करण्यात आली आहे.आज याबाबतचे पत्र राज्य अध्यक्ष धनराज फुसे यांनी श्री दळवी यांना दिले आहे.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे व्यापारी लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
श्री दळवी हे सावंतवाडी व्यापारी संघटना तसेच जिल्हा व्यापारी संघटनेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. हे सर्व लक्षात घेता पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे असे हुसे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

\